ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयामध्ये ' माझी समृद्ध माय मराठी ' या विषयावरती चर्चा संपन्न
प्रा.वैजनाथ महाजन यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना डॉ. मोहन पाटील त्यांच्यासोबत प्रा.संजय ठिगळे,वसंतराव पुदाले,भागवत थोरात व इतर
सांगली प्रतिनिधी.ता. ९
अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत साखर कारखाना परिसरातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयामध्ये 'माझी समृद्ध माय मराठी' या विषयावर खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा.वैजनाथ महाजन म्हणाले की, "भाषा माणसाला समृद्धीच्या शिखरावर पोहोचवते. विशेषकरून महाराष्ट्रात मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान वाटतो हे जरी खरे असले, तरी इथून पुढच्या काळात मराठीला उत्तम दिवस येण्यासाठी फक्त मराठी भाषा बोलून चालणार नाही तर, चांगले कसदार मराठी साहित्य निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक लेखक मंडळींच्या खांद्यावर आहे .त्यामध्ये वाचकांची भूमिका महत्त्वाची आहे."
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ग्रंथालयाचे सचिव विठ्ठल मोहिते यांनी केले.प्रास्ताविक अध्यक्ष इंजिनियर वसंतराव पुदाले यांनी केले.
याप्रसंगी राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त विठ्ठल मोहिते यांनी वाचनालयास ५० पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला .याप्रसंगी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की,मुलांना अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत मात्र ते होत असताना मुलांना लहान वयातच मराठी भाषेचे बाळकडू पाजले पाहिजे. त्याशिवाय त्याला मराठी भाषेची आवड निर्माण होणार नाही.
उपस्थितांचे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.
याप्रसंगी विठ्ठल मोहिते,भागवत थोरात ,भानुदास मोहिते,विजय मोरे , ग्रंथपाल आर. जे. पाटील, श्रीकांत पाटील व वाचकवर्ग उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.