मालती पाटील कन्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा
विवेक वार्ता ईश्वरपूर प्रतिनिधी: ता.२६
मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेविकांनी महाराष्ट्र शासनाच्या वन परिमंडळ इस्लामपूर (वनक्षेत्र शिराळा) येथील दत्त टेकडी परिसरातील संरक्षित वनक्षेत्राच्या भागात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्लास्टिक मुक्त परिसर, वृक्षारोपण, सीडबॉल ऍक्टिव्हिटी राबवली. तसेच स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पर्यावरण विभाग, सह्याद्री नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 'स्वच्छता हीच सेवा' या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात येऊन सभोवतालच्या परिसरातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले .तसेच रिकाम्या जागेत सीडबॉल टाकले व काही भागात वृक्षारोपण केले.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वन परिमंडळ अधिकारी श्री दादासाहेब बर्गे म्हणाले, “बिबट्या हा प्राणी मनुष्यावर ९९ % हल्ला करत नाही. तर त्याला जे पाहिजे ते खाद्य तो शोधत असतो तसेच या प्राण्याविषयी असणारे गैरसमज दूर केले पाहिजेत जैवविविधता टिकली पाहिजे.”
रेस्क्यू टीम सदस्य युनुस मणेर यांनी सापाच्या विविध प्रजातींविषयी माहिती दिली. तसेच सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचार करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचारासाठी दाखल व्हावे तसेच प्राणी हे आपले मित्रच आहेत शत्रू नव्हेत असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.मालती महाविद्यालयाने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा पाटील डॉ.मेघा संजय पाटील, माजी कार्यक्रमाधिकारी डॉ राम घुले, पर्यावरण विभागाच्या पदमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका उपस्थित होते. प्रा.स्वाती चौधरी यांनी सूत्रसंचालन यांनी केले. तर प्रा. के. बी पाटील यांनी आभार मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.