" असुरक्षितेतची कोणतीही भावना मुलींनी मनात ठेवू नये " ; सपोनि भगवान पालवे यांचे आवाहन
भिलवडी प्रतिनिधी : दि.२३
भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस कर्मचारी यांनी सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला भेट दिली व मुला - मुलींशी मुक्त संवाद साधला.
यावेळी त्यांनी होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत मुला-मुलींनी कोणती काळजी घ्यावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले .याशिवाय व्यसनाधीनते पासून मुलांनी दूर राहिले पाहिजे असेही सांगितले . विविध ठिकाणांवरून येणाऱ्या मुलींनी शाळेत येताना व जाताना एखादी व्यक्ती अथवा युवक त्रास देत असेल, शेरेबाजी करत असेल किंवा समूहाने आक्षेपार्ह वर्तन करत असेल तर तात्काळ निःसंकोचपणे आपल्या शिक्षकांशी अथवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा .तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
काहीही मनात न ठेवता समाजातील कोणत्याही घटकांकडून त्रास होत असल्यास सांगावे, असे आवाहन सर्व मुलींना केले.
याशिवाय मोबाईलचा मुलांनी गैर वापर होणार नाही याची काळजी घ्यावी.शिक्षणाशिवाय पर्याय नाही.यासाठी अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत.यातूनच देशाचे चांगले नागरिक बनाल असे मार्गदर्शनही केले.
यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सहसचिव के. डी. पाटील ,मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, पत्रकार शशिकांत राजवंत ,. पंकज गाडे व पोलीस कर्मचारी , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.