सेकंडरी स्कूल भिलवडीचे पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश,

Admin

 सेकंडरी स्कूल भिलवडीचे पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश,


भिलवडी प्रतिनिधी -दि.११

      फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (५वी) व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (८वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्याची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये इ.५ वी गुणवत्ता यादीत चि .अर्णव अमृत पोतदार  याने  ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीत २९ वा क्रमांक प्राप्त केला .याशिवाय इ.८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चि.अथर्व आनंदराव कदम याने जिल्हा गुणवत्ता यादीत ४२ वा क्रमांक,कु.वर्षा संभाजी पुजारी हिने  जिल्हा गुणवत्ता यादीत४५,कु.तनिष्का अजितकुमार पाटील हिने१६४  वा क्रमांक   मिळवला. 

या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय मोरे , उपमुख्याध्यापक श्री.विजय तेली , पर्यवेक्षक श्री. विनोद सावंत, स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री.शंकर केंगार यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, अभिनंदन करण्यात आले .या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख , राजीव आरते, प्रमोद काकडे, सुनिल भोये, शंकर बल्लाळ, प्रल्हाद पोवार,विद्या रोडे,  सौ.पौर्णिमा धेंडे,सौ.वर्षा चौगुले कु..गुनाले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top