' वर्षानुवर्षे रखडलेला न्यायालयीन बदली कामगारांचा प्रश्न श्रद्धेय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मार्गी लागणार '

Admin

' वर्षानुवर्षे रखडलेला न्यायालयीन बदली कामगारांचा प्रश्न श्रद्धेय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मार्गी लागणार '


विवेक वार्ता पुणे प्रतिनिधी : दि.१३ 

सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायालयीन बदली कामगारांनी गेली २५-३० वर्षे शासनाच्या अधिन राहून प्रामाणिक सेवा बजावली आहे. तरीदेखील त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव मुद्दाम मंत्रालयाच्या टेबलावर थांबवून ठेवण्यात आला होता.

   श्रमिकांचा आधारस्तंभ श्रद्धेय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या कामगारांची कागदपत्रे तपासून स्वतः पुढाकार घेतला असून, मंत्रालयात प्रलंबित कामावर आता त्यांनी थेट लक्ष केंद्रीत केले आहे.


  वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली यांच्या वतीने, राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन कामगारांचे कागदपत्रे दाखवून अडचणी सांगण्यात आल्या. गेल्या ५-६ महिन्यांत युनियनच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला भाग पाडून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, सिव्हिल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चालढकल करून ही फाईल सचिवालयाच्या टेबलावर रखडवली असल्याचा आरोप करण्यात आला.

  या सर्व गोष्टींची तपासणी करून, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः या प्रकरणावर मंत्रालयात लक्ष घालून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या कामगारांमध्ये आता नवी आशा निर्माण झाली आहे.

  न्यायालयीन बदली कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा निर्धार शिष्टमंडळाने केला आहे.

मा. मुंबई मॅट कोर्ट आदेशाचा अवमान करून सिव्हिल प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.

   शासनाने विलंब केला तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंत्रालयाला धडक दिली जाईल.व  संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

  यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या आ. निर्मलाताई वनशु मॅडम,मुंबई हायकोर्टाचे वकील अँड. मनोहर वाघमारे,भारतीय बौद्ध महासभा सांगली,जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर,वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा जेष्ठ नेते किशोर आढाव,वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे,सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे,तसेच न्यायालयीन बदली कामगार  सुमन कामत, शोभा पोतदार, आशाबाई जोगदंड, उषाबाई शिनगारे, दशरथ गायकवाड, मोहन गवळी, रशीद सय्यद, राजु कांबळे, प्रकाश गायकवाड, मुनीर मुजावर, धर्मेंद्र कांबळे, शब्बीर पठाण, संतोष आडसुळे, भारत राऊत

आणि कोल्हापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बदली कामगार उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top