नानासाहेब महाडिक अभियांत्रिकीमध्ये 'भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे' आयोजन..
मा.राहुल दादा महाडिक
विवेक वार्ता पेठनाका प्रतिनिधी :
येथील नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पेठ येथे श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव मा. राहुल महाडिक (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त 'भव्य बुद्धिबळ स्पर्धा' चे आयोजन केले आहे. यामध्ये १४ व १९ वर्षांमध्ये सहभागी सर्व वयोगटासाठी या स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धा शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहेत.
सदर स्पर्धेमध्ये पेठ बरोबरच इस्लामपूर, नेर्ले, कामेरी इत्यादी भागातील शालेय विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल आणेकर यांनी केले आहे.
महाडिक शैक्षणिक संकुल हे शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, समाजिक उपक्रम या उक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते व हे प्रयत्न फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादीत न राहता इतर मुलांनाही त्याचा लाभ मिळावा हा उद्देश ठेवून व मा. राहुल दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धाचे आयोजन केले आहे अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी यांनी दिली.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.