सिने सृष्टीतील दिग्गज जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन., हरहुन्नरी कलाकार हरपला..
विवेक वार्ता प्रतिनिधी - मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
विजय हे गेले दीड वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते.त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कला, नाट्य,चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जेष्ठ अभिनेते विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. सध्या ते ती परत आलीये या मालिकेत बाबुराव तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत होते.
मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना आता व्यक्त केली जातेय. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.