सेकंडरी स्कूल, भिलवडी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा...
भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी "स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आजच्या दिवशी नमन . तसेच स्वातंत्र्याचा उपयोग आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करावा. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगण्याचा भावार्थ लोकमान्य टिळक, आगरकर यांना जो अपेक्षित होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. चांगला माणूस, चांगला नागरिक, चांगली पिढी निर्माण करण्याचा उद्देश हा आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा असावा व तोच उद्देश ठेवून चांगला नागरिक बनावा हीच या स्वातंत्र्यदिनी अपेक्षा आहे " असे मत मा.विश्वास चितळे यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी प्लास्टिक निर्मूलन अंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमधील उत्तीर्ण, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, विश्वस्त गिरीश चितळे,अशोक चौगुले,संस्थेचे संचालक धनंजय पाटील ,संभाजी सूर्यवंशी, महावीर वठारे सौ.लीना चितळे, संस्थेचे सचिव मानसिंग हाके ,सहसचिव के. डी. पाटील मुख्याध्यापक संजय मोरे ,उप मुख्याध्यापक विजय तेली ,पर्यवेक्षक विनोद सावंत, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू वाटप करण्यात आले .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर विभागाचे प्रा. शिवाजी कुकडे, श्री.शंकर बल्लाळ यांनी केले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.