प्रलंबित मागण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा .

Admin

 प्रलंबित मागण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा .


सांगली प्रतिनिधी - सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय  पर्यंत मोर्चा काढण्यात आला.  


  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने राज्यभर एकाच वेळी मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे २६ विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा इथून झाली. जवळजवळ दोन किलोमीटर पर्यंत प्रचंड रांग शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर सेवक यांची मोर्चात पाहायला मिळाली. यावेळी झालेल्या सभेत शासनाने प्रलंबित  विविध मागण्यांचा वेळेत निर्णय घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली. 




यावेळी १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय दुरुस्त करावा. एक नोव्हेंबर२००५ पूर्वी विनाअनुदनित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घ्यावा .प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने जाहीर करावे. पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात. शाळेतील कला क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी मिळावी .शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना आणावी. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे. केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी उपशिक्षणाधिकारी असलेल्या प्रशासकीय पदावरील पदोन्नत्या नियुक्त्या कराव्यात. यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .








या मोर्चाला ,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अमृत पांढरे ,सचिव संजय झांबरे ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैक्षणिक संस्था अध्यक्ष रावसाहेब पाटील, विनोद पाटोळे,शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष आर. के. चोपडे, शिक्षक परिषदेचे माजी आमदार भगवानराव साळुंखे ,शैक्षणिक व्यासपीठाचे राजेंद्र नागरगोजे ,शिक्षक भारतीचे सुधाकर माने, कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत , जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, बहुजन अधिकारी कर्मचारीचे विजय कांबळे, बाळासाहेब कटारे, जुनी पेन्शन संघटनेचे अमोल शिंदे ,बापू दाभाडे,शिक्षक महासंघाचे अरविंद गावडे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top