कास्ट्राईब नेते मा. नामदेवराव कांबळे साहेब यांचा सत्कार व महिला मेळावा संपन्न.

Admin

 कास्ट्राईब नेते मा. नामदेवराव कांबळे साहेब यांचा  सत्कार व महिला मेळावा संपन्न. 




सांगली प्रतिनिधी - कास्ट्राईब नेते मा. नामदेवराव कांबळे साहेब यांना नुकताच सामाजिक न्याय विभागाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीच्या वतीने मा. नामदेव कांबळे साहेब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. 

यावेळी ' समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य, ऋण जाणून संघटनांच्या माध्यमातून आपल्या बांधवांसाठी कार्य करत रहावे ' असे विचार मा. नामदेव कांबळे  यांनी मांडले. तसेच ' समाजातील शिकलेल्या सर्व घटकांच्या भाकरीची व्यवस्था व ती टिकवण्याची जबाबदारी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून केले जाते त्यामुळे संघटनेत सहभागी व्हावे ' असे आव्हान वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी केले. 




     यावेळी मिरज तालुकाध्यक्षपदी मगन बरफ , खानापूर तालुकाध्यक्षपदी नितीन चंदनशिवे, सा. मि. कु महापालिका क्षेत्र महिला आघाडी अध्यक्षपदी सौ मंगल कांबळे, महापालिका क्षेत्र माध्यमिक शिक्षक विभाग अध्यक्षपदी  दत्तात्रेय हाबळे यांची निवड तसेच जिल्हा सदस्यपदी  भगवान भंडारे व दादासाहेब कांबळे  यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र मा. नामदेवराव कांबळे मा. बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार राहुल थोरात  यांना प्राप्त झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.   याशिवाय संगणक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. अश्लेषा काळे,तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. अर्चना तोडकर तसेच बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या महिला उद्योजिकांचा, महिला भगिनींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 






या कार्यक्रमाला कास्ट्राईब शिक्षक संघटना प्रचार व प्रसार प्रमुख यशवंत सर देसाई, सचिव विद्याधर रास्ते , कार्याध्यक्ष सुरेश कोळी, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे,  मुख्य संघटक अशोक हेळवी, संघटक सचिव अण्णासाहेब कुरणे, उपाध्यक्ष उत्तम मंगल, सौ पतंगे,निलम बरफ, रमा काकडे, रोहिणी मंगल,पुनम यादव,सोनाली वरठा, भारती कलादगी, अश्लेषा काळे, हेमा आवळे, ज्योती हाबळे,तेजस्विनी दबडे, महानंदा जाल्याळ, आम्रपाली कांबळे,चंदा आरवाळे, निशा माळगे सुरेखा साळुंखे,कविता कांबळे, सतीश कांबळे, आदी पदाधिकारी, महिला भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले, सुत्रसंचालन महिला आघाडी प्रमुख संगिता कांबळे यांनी केले. तर आभार जिल्हा सचिव विद्याधर रास्ते यांनी मानले.



संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top