केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाकडून सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडीच्या आठ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त

Admin

 केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाकडून सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडीच्या आठ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त 


भिलवडी प्रतिनिधी - सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीच्या ८ विद्यार्थिनींना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय,नवी दिल्ली यांचे कडून प्रत्येकी रुपये ५०००/- याप्रमाणे एकूण ४०,०००/- रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाकडून संपूर्ण देशातून संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी सेकंडरी स्कूल भिलवडी च्या आठ विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत . वैष्णवी मोकाशी, समिक्षा वावरे, श्रावणी वाळवेकर ,श्रुतिका कुकडे, साक्षी कुर्लेकर, सृष्टी चौगुले, सुखदा भोळे ,अदिती माने या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.विद्यालयातील संस्कृत शिक्षक श्री अमृत पोतदार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. 

तसेच मुख्याध्यापक श्री संजय मोरे ,उपमुख्याध्यापक श्री विजय तेली ,पर्यवेक्षक श्री.विनोद सावंत तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही मार्गदर्शन, सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल भिलवडी शिक्षण संस्था, भिलवडी व सेकंडरी स्कूल ज्युनिअर कॉलेज, भिलवडी मार्फत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top