कोवळ्या उन्हाचे आरोग्यासाठी होणारे फायदे

Admin

 कोवळ्या उन्हाचे आरोग्यासाठी होणारे फायदे



विवेक वार्ता उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. मात्र त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत. मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारचे व्हिटॅमिन गरजेचे असतात. त्यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन  डी. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप गरजेचं आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन डी चे उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर रोज सकाळी 20 ते 30 मिनिटे कोवळ्या उन्हात उभे राहण्याचा सल्ला देतात. व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणापासून मिळते. मात्र सूर्याच्या प्रखर किरणांऐवजी सकाळी आठ वाजेपर्यंतची कोवळी उन्हे घ्या. सूर्याची कोवळी किरणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक रोग ही दूर होतात. सूर्याच्या किरणांमुळे शरीराला काय काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊ. 



१) तणाव कमी करण्यासाठी

 सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने किंवा चालल्याने  शरीरात मेलाटोनिन नियंत्रित करण्यास मदत मिळते. त्यामुळे ताण-तणाव व स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. फक्त कोळ्या उन्हात बसण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील केल्यामुळे फायदा होतो.  तुमचा तणाव कमी होऊ शकतो. 

२) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ 

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रक्तातील  आँक्सिजनचे प्रमाण सुर्य किरणांमुळे वाढते. सूर्याच्या किरणामुळे कमी वेळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर अनेक आजारांचा धोका कमी होतो. 


३)
हाडेआणि मजबूत करण्यासाठी   

हाडे ठिसूळ असतील तसेच कॅल्शियमच्या बरोबर विटामिन डी ची  भूमिका मुख्य असते. सूर्याची किरणे व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत आहे. दररोज 15 मिनिटे जरी कोवळ्या उन्हात व्यायाम केला तरी किंवा चालला तर हाडांना बळकटी येते.शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. कोवळ्या ऊन्हात अंग शेकल्याने सांधेदुखी व थंडीमुळे होणारा अंगदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून डॉक्टर ही हिवाळ्यात कोवळ्या उन्हात फिरण्याचा सल्ला देतात. 


४) निरोगी झोपेसाठी
 

जर रोज एक तास कोवळ्या ऊन्हात  बसल्यास किंवा व्यायाम केल्यास रात्री चांगली झोप येते याचे कारण म्हणजे तुम्ही जितके जास्त वेळ कोवळ्या वनात बसाल तितके झोपताना तुमची शरीर जास्त मेलाटोनिन हार्मोन्स निर्माण करते. त्यामुळे तुम्हाला खूप चांगली झोप येते. 

५) वजन नियंत्रणासाठी 

सूर्याची कोवळी किरणे आणि बीएमआय यांच्या थेट संबंध आहे. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. हिवाळ्यात कमीत कमी १५ मिनिटे उन्हात बसले पाहिजे जेणेकरून आपले वजन नियंत्रण राहील.


६) बुरशीजन्य विकारावर

त्वचेवर कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य आजार झाला असेल तर कोवळ्या उन्हात बसावे. त्यामुळे बुरशीजन्य जिवाणूंच्या संसर्गाचा आजार बरा व्हायला मदत होते. एक्जिमा सारखे त्वचा विकारही कोवळ्या उन्हात बसल्याने कमी होतात. 


७) काविळीवर उपाय

 कावीळ सारख्या गंभीर आजारात तो बरा करण्याची क्षमता सूर्यकिरणांमध्ये असते. त्यामुळे कावीळच्या रुग्णांना उन्हात बसण्याचा सल्ला दिला जातो. 

असे अनेक फायदे कोवळ्या उन्हात बसल्याने होत असतात. म्हणून आता थंडीच्या दिवसात तर कोवळ्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घ्या व आरोग्य चांगले ठेवा.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top