यश अपयश पचवण्याची ताकद खेळामुळे येते- संदीप यादव

Admin

 'यश - अपयश पचवण्याची ताकद खेळामुळे येते' - संदीप यादव 


भिलवडी प्रतिनिधी - शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,भिलवडीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. 

'आयुष्य जगत असताना येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ खेळामुळे मिळते. यश अपयश पचवण्याची ताकद खेळामुळे निर्माण होते. व व्यक्तीमत्वाचा विकास होतो ' असे विचार शाळेचे  माजी विद्यार्थी,खेळाडू संदीप यादव यांनी व्यक्त केले. यावेळी सानिका कोळी हिने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. 


भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे यांनी अध्यक्षीय भाषणात 'आयुष्य जगण्याची कला खेळामुळे समजते. आपल्या कलागुणांना वाव, प्रोत्साहन अशा क्रीडा महोत्सवातून मिळते असे विचार व्यक्त केले.


या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत ,सर्व क्रीडाशिक्षक, शिक्षकेतर सेवक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख निलेश कुडाळकर यांनी केले .पाहुणे परिचय पी .बी पाटील यांनी,सूत्रसंचलन सुनील भोये यांनी केले त एकर शेवटी आभार सौ. रोडे यांनी मानले.




संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top