सेकंडरी स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Admin



 सेकंडरी स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

भिलवडी प्रतिनिधी -भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेचे पर्यवेक्षक विनोद सावंत सर यांच्या हस्ते  संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कु.स्वप्नाली चव्हाण हिने संविधान उद्देशिकेचे वाचन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान व संविधान भारतीयांचे हक्क अधिकार कसे अबाधित ठेवते याबद्दल  आपली मनोगते व्यक्त केली. संविधानाने सर्व भारतीयांना एकत्रित गुंफून ठेवले आहे तसेच संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता हे हक्क दिले आहेत. यामध्ये सर्व समान आहेत असे विचार पर्यवेक्षक विनोद सावंत यांनी व्यक्त केले.          यावेळी रूपेश कर्पे, शंकर बल्लाळ,सौ.आर झेड तांबोळी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर सेवक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 






      याशिवाय मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली,बाळासाहेब कोळी निलेश कुडाळकर प्रमोद काकडे , सुनिल भोये,सौ.वर्षा चौगुले,सौ.पौर्णिमा धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत भिलवडीच्या पटांगणात भिलवडीच्या सरपंच सीमा शेटे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी यांनी सामुदायिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले . संविधानाने दिलेले हक्क, अधिकार ,आपली कर्तव्ये याबाबत माहिती देण्यात आली.व संविधान सन्मान रॅलीची सांगता करण्यात आली.

.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top