कास्ट्राईब शिक्षक संघटना ही फक्त कर्मचार्यांच्या प्रश्नांपुरती मर्यादित संघटना नसून एक सामाजिक व शैक्षणिक चळवळ आहे - आकाश तांबे.
सोलापूर प्रतिनिधी - क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुणवंत कर्मचारी, पत्रकार, बेटी पुरस्कारांचे वितरण आमदार आदिती शिंदे, राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे होते. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना ही फक्त कर्मचार्यांच्या प्रश्नांपुरती मर्यादित नसून समाजातील सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर न्याय मिळवून देणारी एक चळवळ आहे असे प्रतिपादन आकाश तांबे यांनी केले.तसेच खाजगीकरणातून शिक्षण क्षेत्रातील आरक्षण संपवून बहुजनांना शिक्षणाची दारे सरकार बंद करीत आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेने लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भूमिका घ्यावी . असे विचार प्रमुख पाहुण्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी तुकाराम जाधव यांचे व्याख्यान झाले. यावेळी गोंदियाचे शिक्षणाधिकारी कादीर शेख, राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, सातारा जिल्हाध्यक्ष संजय खरात आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी केले. सुत्रसंचलन मंजुषा कलशेट्टी यांनी केले. तर आभार जिल्हा सरचिटणीस सोमलिंग कोळी यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.