श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

Admin

 श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 


हरिपूर प्रतिनिधी दि. ३०. येथील न्यू एज्युकेशन सोसायटी,सांगली संचलित, श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे ग्रामीण कथाकार हिम्मत पाटील हे होते. तर अध्यक्षस्थानी सरपंच मा. सौ. राजश्रीताई अरविंद तांबेकर या होत्या.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन कर

ताना हिम्मत पाटील म्हणाले की, "मोबाईलमुळे जग जवळ आले पण माणूस माणसापासून दूर होत चाललाय. आभासी दुनियेत नवी पिढी भरकटत चालली आहे. शाळेतील वाचनालय आणि उत्तम सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा मिळते. यासाठी वाचन संस्कृती रुजवण्याची नितांत गरज आहे." यावेळी त्यांनी 'हसू आणि आसू' यांचा सुरेख संगम असणारी 'माती' ही भावपूर्ण कथा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

           यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु. प्रांजली तेलवेकर, कु. संस्कृती नंदकुमार जाधव हिने सुविचार ,कु नंदिनी सुरेश गंजाळ हिने- सावित्रीबाई फुले बोलतेय, चि. अनिरुद्ध सचिन जाधव याने 'स्वामी विवेकानंद' यांचे मनोगत,कु. राजनंदिनी रविंद्र सूर्यवंशी हिने 'सुधा मूर्ती' यांची अनुक्रमे मराठी,हिंदी ,इंग्रजी भाषेतून मनोगते  सादर केली.

      स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार यांनी केले. श्री.अजितकुमार कोळी यांनी पारितोषिकांचं वाचन केलं.  सुनील खोत व पूजा पाटील यांनी अनुक्रमे बौद्धिक व क्रीडा पारितोषिकांचे वाचन केलं. अहवालवाचन राजकुमार हेरले यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते तर आभार कार्याध्यक्ष सौ. संध्या गोंधळेकर यांनी मानले .

  यावेळी उपसरपंच श्री. युवराज बोंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संदीप सूर्यवंशी,श्री. गणपतराव साळुंखे ,श्री.गजानन जगदाळे,सौ. सुनीता शेरीकर,श्री. प्रकाश कांबळे,सौ. सुवर्णा आळवेकर,सौ. स्नेहलता पवार,श्री. सदाशिव पवार,श्री. आशिष बोंद्रे ,श्री.महेश बोंद्रे,श्री. किशोर गोंधळेकर,श्री. प्रकाश सूर्यवंशी,सौ.स्मिता बेनिचेटगे,सौ.गीतांजली आसगावकर, सौ.भारती जितकर, राजन कारंजकर,विद्यार्थी प्रतिनिधी चि. अनिरुद्ध जाधव चि. विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.अस्मिता ठोंबरे , शिक्षक-सेवक ,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top