सेकंडरी स्कूल, मध्ये थोर गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, राष्ट्रीय गणित दिन साजरा.

Admin

 सेकंडरी स्कूल,  मध्ये थोर गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती, राष्ट्रीय गणित दिन साजरा


विवेक वार्ता भिलवडी - येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती व राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमेश वावरे, शाळेचे मुख्याध्यापक  संजय मोरे, उपमुख्याध्यापक  विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. याशिवाय गणितावर आधारित चारोळ्या, पाढे सादर केले. तसेच थोर गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी गणित विषयावर आधारित शोध पत्रे तयार केली. तसेच गणितावर आधारित सहाशे परिमाणे  शोधून काढली आहेत . अशी माहिती गणित शिक्षक श्री. पी. बी पाटील सर यांनी दिली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top