सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

Admin

 सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.


भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे मा. कय्युम पठाण व जेष्ठ शिक्षिका एस. आय चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिक्षा रामचंद्रे, सपना गायकवाड, तेजस खरात यांनी करून दिला. याप्रसंगी संस्थेचे सचिव मानसिंग हाके, पर्यवेक्षक विनोद सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृत पोतदार, निलेश कुडाळकर, रूपेश कर्पे, प्रमोद काकडे, राजीव आरते, शंकर बल्लाळ, सौ. एस. ए यादव, सर्व शिक्षक बंधु-भगिनी,शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top