कोंडाबाई साळुंखे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेस प्रारंभ.

Admin

 कोंडाबाई साळुंखे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेस प्रारंभ. 


 हरीपूर प्रतिनिधी दि.६ - येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ बास्केटबॉलचे राष्ट्रीय पंच प्रा. संजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार हे होते. प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.


     प्रास्ताविक श्री विठ्ठल मोहिते यांनी केले. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. संजय पाटील म्हणाले की, 'अभ्यासाबरोबरच आपण खेळासही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त व मन हलकं राहतं. केलेला अभ्यास चांगला स्मरणात राहतो. खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळताना बुद्धीचा कस लागतो. मन, मेंदू ,मनगट विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ हे खेळलेच पाहिजेत.


     दिव्यांग समता सप्ताहानिमित्त कु. तनुजा गायकवाड व कु. आर्या सूर्यवंशी या विद्यार्थीनींना पाहुण्यांनी गुलाबपुष्प देऊन प्रेरणा व प्रोत्साहन दिले. महापरिनिर्वाण दिन व दिव्यांग समता सप्ताहानिमित्त श्री. अजितकुमार कोळी यांनी विचार व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थी प्रतिनिधी अनिरुद्ध जाधव यांने क्रीडा प्रतिज्ञा दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती अक्षय पाटील यांची होती.

       या स्पर्धेचे संयोजन क्रीडाशिक्षक सौ. पूजा पाटील व श्री. राजकुमार हेरले यांनी केले. सुनील खोत यांनी आभार मानले. याप्रसंगी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष सौ.संध्या गोंधळेकर, विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी कु. अस्मिता ठोंबरे, शिक्षक- सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top