कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.


विवेक वार्ता सांगली प्रतिनिधी - 

भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माते, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,सचिव विद्याधर रास्ते, कार्याध्यक्ष सुरेश कोळी, उपाध्यक्ष उत्तम मंगल, संघटक सचिव आण्णासाहेब कुरणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दिप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन, दलित, दुबळ्यांना संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. या त्यांच्या उपकाराची परतफेड होवू शकत नाही.असे विचार बाजीराव प्रज्ञावंत यांनी व्यक्त केले. अशा या उद्धारकरत्याला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम !!! 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top