मुलांवर योग्य संस्कारांची गरज - बालमानसोपचार तज्ञ डॉ. भूषण शुक्ल

Admin
मुलांवर योग्य संस्कारांची गरज-बालमानसोपचार तज्ञ डॉ. भूषण शुक्ल


भिलवडी प्रतिनिधी -
 भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मुलांचे बालमानसशास्त्र व पालकांची भूमिका या विषयावर प्रसिद्ध बाल मानसोपचारतज्ञ डॉ. भूषण शुक्ल, पुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .याप्रसंगी

आपल्या 
मुलांसाठी पालकांनी वेळ द्यावा ,आपणच मुलांचे आदर्श बनावे ,आपल्या कृतीतून मुलांमध्ये आदर निर्माण करावा, मुलांच्या मध्ये शिस्त राबवण्याचा प्रयत्न करावा , मुलांचे योग्य वेळी कौतुक करा, त्यांना प्रेम द्या अशा प्रकारे मुलांमध्ये बदल घडवून आणता येतात. असे विचार प्रमुख पाहुण्यांनी पालकांना  मार्गदर्शन करताना व्यक्त केले .सुरुवातीला स्वागत व प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय मोरे यांनी केले, पाहुणे परिचय श्री. के. डी पाटील यांनी करून दिला.   

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अनघा चितळे उपस्थित होत्या. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचे विश्वस्त जे. बी चौगुले, संचालक जे. के. केळकर, सचिव मानसिंग हाके, पत्रकार सचिन टकले,संपादक शशिकांत कांबळे, पंकज गाडे, प्राचार्य दीपक देशपांडे, मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, तुषार पवार, पर्यवेक्षक विनोद सावंत, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख गुंडाजी साळुंखे, सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक व पालक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अमृत पोतदार यांनी केले.तर आभार सौ. मनिषा पाटील यांनी मानले. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top