संविधानामुळे भारतीयांचे हक्क अबाधित,संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा- मा. मारूती नवलाई
सांगली प्रतिनिधी - कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा सांगलीचे वतीने 74 वा संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात वृत्तपत्र भवन येथे संपन्न झाला. सुरुवातीला घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मा. मारुती नवलाई शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले हक्क अबाधित ठेवले आहेत. तसेच भारतीयांच्या प्रगतीत, विकासात संविधान मार्गदर्शकाचे काम करत आहे. घटनाकारांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले आहे. व त्याचा उपयोग समाजातील घटकांना होत आहे असे विचार मारुती नवलाई यांनी व्यक्त केले. यावेळी २६/११/२०२३ रोजी मुंबई येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश कोळी, उपाध्यक्ष उत्तम मंगल, संघटक सचिव आण्णासाहेब कुरणे, महिला आघाडी प्रमुख संगीता कांबळे, राहुल काकडे, शुभम सर्जे आदी उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमासाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, मारुती नवलाई, अमोल साबळे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.