"कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची देशाला गरज" - प्रा. विठ्ठल मोहिते

Admin

 "कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची देशाला गरज" - प्रा. विठ्ठल मोहिते. 


विवेक वार्ता सांगली - 
गोरगरीब व बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील  यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या घरात समृध्दी नेली. लाखो मुलं शिकून स्वावलंबी व स्वाभिमानी झाली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाईं हे खरे छत्रपती शिवाजी महाराज,लोकराजा छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे वारसदार ठरतात.बदलत्या शैक्षणिक प्रवाहात त्यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मा. प्रा. श्री. विठ्ठल मोहिते यांनी व्यक्त केले.

    म्हैसाळ ता. मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य श्री. पुष्पराज शिंदे -म्हैसाळकर होते.तर व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम सी. डी., पर्यवेक्षक श्री. लादे एस. डी., म्हैसाळ ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. पांडुरंग घोरपडे, सौ. आशाताई मराठे, तानाजी चव्हाण, माजी मुख्याध्यापक श्री. डी. आर. शिंदे, भरतेश कबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.


     यावेळी प्रा. विठ्ठल मोहिते पुढे म्हणाले की,बहुजन समाजाला स्थैर्य आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम रयत शिक्षण संस्था करत असून या संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. हे कर्मवीर भाऊराव अण्णा आणि लक्ष्मीबाईं पाटील यांचे फार मोठे उपकार आहेत. अण्णांनी गरिबांच्या, वंचितांच्या चुली पेटवून त्यांना भाकरीची हमी दिली. मागासवर्गीय लोकांना समता दिली. असे उद्गार प्रा.श्री. विठ्ठल मोहिते  यांनी काढले.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुष्पराज शिंदे -म्हैसाळकर हे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त पाळली पाहिजे व शिक्षकांविषयी आदर बाळगला पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. कदम यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला.यावेळी प्रा. एस बी. पाटील, समर्थ जाधव, कु. श्रद्धा नरुटे यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जावळे एस. डी, सौ चव्हाण एस. बी. यांनी तर आभार पर्यवेक्षक श्री. लादे एस. डी. यांनी व्यक्त केले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top