भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने 2 ऑक्टों. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Admin

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने 2 ऑक्टों. महात्मा गांधी  जयंतीचे औचित्य साधून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


विवेक वार्ता सांगली- भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी भव्य असे महा रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाशी असणारे भावनिक नातं, मानवतेचं नातं या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने दृढ  करण्याच्या हेतूने या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


  या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राबरोबर आयुष्यभरासाठी रक्तदात्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना मोफत रक्त आणि रक्तातील घटक देण्याची व्यवस्था  केली आहे. याशिवाय संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ही करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, लिपिड प्रोफाइल तपासणी, शुगर तपासणी, बीपी  तपासणी आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. 


    तरी या  रक्तदानाच्या पुण्य कार्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य  पार पाडावे असे आवाहन  भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर  संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहत, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी व हनुमान मंदिर भिलवडी येथे सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top