सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा.
विवेक वार्ता सांगली - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक के. आर पाटील हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक विनोद सावंत हे होते. सुरुवातीला हिंदी राष्ट्रभाषा याविषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर इ. पाचवी ते दहावीतील मुला-मुलींनी देशभक्ती गीते, सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनपर नाटीका सादर केल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी जगात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत हिंदीचा समावेश होतो, आपल्या देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा असल्याचे सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मानसिंग हाके, सह सचिव के. डी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, जेष्ठ शिक्षक बी. एन शिकलगार, शंकर केंगार, पौर्णिमा धेंडे, गीता गावीत, प्रमोद काकडे, डी. पी भगरे, राजीव आरते, संदीप सदामते, तानाजी पाटील, अमृत पोतदार, सुनिल भोये, निलेश कुडाळकर, बाळासाहेब कोळी, शैलजा चौधरी, आर. झेड तांबोळी, सौ. वैशाली सुर्यवंशी, सौ. एस. ए यादव, वर्षा चौगुले, ए. आर गुणाले, आदी शिक्षक बंधु-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक अनुराधा कांबळे हिने, पाहुणे परिचय सफिया जमादार हिने, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुष्का साळुंखे, प्रिती साळुंखे, आदिती मोहिते यांनी केले. शेवटी आभार श्रेया कांबळे हिने मानले. संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.