कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडी जाहीर, कार्याध्यक्षपदी सुरेश कोळी, सरचिटणीसपदी विद्याधर रास्ते यांची तर महिला आघाडी प्रमुखपदी संगिता कांबळे याची निवड.

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडी जाहीर, कार्याध्यक्षपदी सुरेश कोळी, सरचिटणीसपदी विद्याधर रास्ते यांची तर महिला आघाडी प्रमुखपदी संगिता कांबळे याची निवड. 

विवेक वार्ता सांगली- शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढणारी, त्यांना न्याय मिळवून देणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख म्हणून ओळखली जाणारी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य,  सांगलीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी  विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी जाहीर केल्या . यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप गवळी, उत्तम मंगल व इकबाल पिरजादे यांची निवड, तर  कार्याध्यक्षपदी सुरेश कोळी,  सरचिटणीस पदी विद्याधर रास्ते,  मुख्य संघटक पदी अशोक हेळवी,  कोषाध्यक्षपदी दयानंद सरवदे, तसेच महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ. संगीता कांबळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष पदी सौ पुष्पा माळी यांची  निवड जाहीर करण्यात आली.  संघटन सचिव म्हणून आण्णासाहेब कुरणे, तय्यबअली  नदाफ यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्या म्हणून मुमताज खतीब, सौ. मंगल कांबळे, विनोदिनी मिरजकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेची ध्येय धोरणे व मागासवर्गीय प्रवर्गातील सभासदांचे हित जोपासण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असा विचार व्यक्त केला. त्याचबरोबर संघटनेची विचारधारा समाजामध्ये  वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास यावेळी दिला.या सर्व पदाधिकाऱ्यांचा विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बंधू-भगिनींनी आपले प्रश्न व आपल्या समस्या यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेशी संपर्क   साधावा असे आव्हान विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले आहे.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top