श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न.

Admin

 श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न


   विवेक वार्ता हरिपूर -दिनांक २९ येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये  हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खेळाडू व शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद शिंदे हे होते, तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार होते.

      मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत क्रीडाशिक्षक सौ. पूजा पाटील यांनी तर प्रास्ताविक श्री विठ्ठल मोहिते यांनी केले. यावेळी त्यांनी मेजर ध्यानचंद यांची हॉकीमधील जादूमय देदीप्यमान कामगिरी कथन केली. तसेच जागतिक स्तरावरील भारतीय खेळाडूंचे योगदान विद्यार्थ्यांना सांगितले. सांघिक भावना,ऐक्य आणि  निरामय जीवनासाठी खेळाचं स्थान अनन्यसाधारण असल्याचं सांगितलं.


        यावेळी 'राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या' वतीने शालेय परिसरामधील वृक्षांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून 'पर्यावरणपूरक राखी पौर्णिमा' साजरी केली. यावेळी मुख्याध्यापक दिलीप पवार म्हणाले,  'वृक्ष आपला गुरु आहे. सखा आहे. बंधू आहे. त्याचे संवर्धन हाच आपला बंधूभाव आहे.आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी ही 'राखी पौर्णिमा' वृक्षारोपणाने साजरी करावी. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होवून आपले  जीवन निरामय राहील. तसेच ओवाळणी म्हणून- भाऊ-बहिणींनी एकमेकांना  पुस्तके भेट द्यावीत.'

  आभार राजकुमार हेरले यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ शिक्षक संध्या गोंधळेकर ,हर्षदा काटकर, मनीषा वड्डदेसाई, बबन शिंदे, सुनील खोत, अजितकुमार कोळी यांनी केले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top