उत्तम, निरोगी, चांगल्या आरोग्यासाठी,, त्वचेसाठी फळे व भाजीपाला आहारात आवश्यक...
विवेक वार्ता सांगली. - फळे आणि भाजीपाला आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहार तज्ञ वेळोवेळी आपल्याला आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस करतात. पण आरोग्यासाठी कोणती फळे आणि भाज्या खाणे फायदेशीर असते हे आपल्याला फळे आणि भाज्यांच्या रंगावरून जाणून घेता येईल. फळे आणि भाज्या विविध रंगांमधून त्यामधील घटकांची माहिती घेता येईल.
हिरवा रंग
हिरव्या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये लोह, कॅल्शियम, विटामिन ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन सी व बी कॉम्प्लेक्स इत्यादी आढळतात. याशिवाय हिरव्या पालेभाज्यामध्ये ल्युटीन व झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडेंटस असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल,तर त्याने हिरव्या रंगाची फळे आणि भाज्या खावीत त्यामुळे शरीरातील रक्त झपाट्याने वाढते याशिवाय पालेभाज्या खाल्ल्याने रक्तासोबतच दृष्टीही सुधारते.
लाल रंग
लाल रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते. लाल रंगाची फळे आणि भाज्या ॲनिमियाच्या रुग्णासाठी सुपरफुड पेक्षा कमी नाही. याशिवाय त्यामध्ये लायकोपिन आढळते ;जे कॅन्सर, हृदयाशी संबंधित आजार, डोळ्यांच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
तपकिरी आणि पांढरा रंग
तपकिरी आणि पांढऱ्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये अँटीबॅक्टरियल व अँटिव्हायरल गुणधर्म आढळतात. हे हाडांसाठी फायदेशीर मानले जाते.
केशरी आणि पिवळा रंग
या रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामध्ये कॅरोटीनोइडस्,ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हायोला-झेंथिन यासारखे अनेक फायटोन्यूट्रिएंट्स असतात; जे मज्जासंस्थेसाठी खूप चांगली असतात.
जांभळा रंग
या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यात अँथोसायनिन्स आढळते;जे कॅन्सर विरोधी मानले जाते. या शिवाय रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली चांगली राहते. आणि त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. वांगी, काळी द्राक्षे, जांभूळ, चेरी, ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी यासारख्या फळांचा रंग जांभळा असतो.
फळांमध्ये विटामिन सी आणि ई सारख्या अँटिऑक्सिडंट असल्याने जे फ्री रॅडिकल्स मुळे होणाऱ्या एक्सीडेंटिव्ह तणावापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे अकाली वृद्धत्व, सुरकुत्या यांपासून त्वचेला फळांमुळे आराम मिळतो. लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी किंवा किवी सारख्या फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे विटामिन सी, कॉलेजन सिंथेसिस साठी आवश्यक आहे. कॉलेजन हे एक प्रथिन आहे जे त्वचेला रचना आणि लवचिकता प्रदान करते. अनेक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी आणि लवचिक दिसते. तर डीहायड्रेशनमुळे कोरडेपणा फ्लॅटनेस आणि निस्तेज रंग येऊ शकतो. पपई आणि अननस सारख्या फळांमध्ये एंन्झाईम्स असते जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.डोळ्यांच्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेले पपई, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू यासारख्या फळांचा आहारात समावेश असावा.
तसेच विविध फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचे उत्कृष्ट स्रोत असतात. त्याचबरोबर फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने फळे योग्य पचनासाठी मदत करतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. म्हणून रोजच्या आहारात फळे आणि भाजीपाला आवश्यकच आहे.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.