सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी चांद्रयान - 3 च्या लँडिंगचे प्रत्यक्ष प्रक्षेपणाद्वारे ठरले साक्षीदार.

Admin

 सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी चांद्रयान - 3 च्या लँडिंगचे प्रत्यक्ष प्रक्षेपणाद्वारे ठरले साक्षीदार. 


   विवेक वार्ता सांगली - इस्रोच्या चांद्रयान - 3 या मोहिमेअंतर्गत यानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर होणारे लँडिंग सहा वाजून चार मिनिटांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मोठ्या स्क्रीनवर बाबासाहेब चितळे सभागृहात दाखवण्यात आले. यासाठी इयत्ता नववी दहावी मधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर प्रोजेक्टर द्वारे प्रक्षेपण दाखवण्याची सोय शाळेच्या वतीने करण्यात आली होती.   

                                                   अखेर भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याचा मान पटकाविला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.   

       

                          इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आजअखेर प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल. 

१४० कोटी भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच, विद्यार्थ्यांना ही यशस्वी मोहीम प्रत्यक्ष अनुभवता यावी, या हेतूने हे नियोजन केले होते . विद्यार्थ्यांनी अत्यंत समरस होऊन, या मोहीमेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.


यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके , सहसचिव के. डी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे , उप मुख्याध्यापक विजय तेली , पर्यवेक्षक व्ही. आर. सावंत ,जेष्ठ शिक्षक बी. एन शिकलगार, तानाजी पाटील, के. आर पाटील, पी. बी पाटील,संदीप सदामते, प्रमोद काकडे, सुनिल भोये, शंकर केंगार, बाळासाहेब कोळी,राजीव आरते, निलेश कुडाळकर, अमृत पोतदार, डी. पी. भगरे, शंकर बल्लाळ, सौ. रौनक तांबोळी,श्रीमती शैलजा चौधरी, एस. ए यादव, सौ. पौर्णिमा धेंडे, सौ. जी. एम गावीत, वर्षा चौगुले,सौ. शिंदे, सौ. सुर्यवंशी, सौ. नाईक, सौ. पाटील आदी शिक्षक  बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन विज्ञान विषय शिक्षकांनी केले.तर विशेष शिक्षक सागर कदम यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले. 


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top