अनुसूचित जाती व जमाती परिवर्तन महामेळाव्याच्या अध्यक्ष पदी मा. विवेकरावजी कांबळे यांची सर्वानूमते निवड. .

Adminअनुसूचित  जाती व जमाती परिवर्तन महामेळाव्याच्या अध्यक्ष पदी मा. विवेकरावजी कांबळे यांची सर्वानूमते निवड .परिवर्तन महामेळाव्याची समिती सदस्य निवड बैठक उत्साहाने संपन्न.

______________________________________


विवेक वार्ता सांगली -  येथील शासकीय विश्रामगृह (सर्कीट हाऊस)  सांगली जिल्ह्यामध्ये नियोजित अनुसूचित जाती व जमाती परिवर्तन महामेळावा-२०२३ समितीची बैठक आयोजित करणेत आली होती.  सुरवातीला सर्व महापुरूषांना अभिवादन करून बैठकीची सुरवात करणेत आली. प्रथमतः मेळाव्याच्या नेटके नियोजना करीता आवश्यक असणार्या विवीध बाबींवर सखोल चर्चा करणेत आली. यावेळी विवीध मान्यवरांनी महापरिवर्तन मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी अनुसूचित  जाती व जमाती परिवर्तन महामेळाव्याच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते बहूजन समाजाचा बुलंद आवाज, मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांची सर्वानूमते निवड करणेत आली. तसेच मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली महापरिवर्तन मेळाव्याची समिती गठीत करणेत आली.


      परिवर्तन मेळाव्याच्या उपाध्यक्षपदी मा. सतिश मोहीते, मा. संदिप ठोंबरे, बिरेंद्र थोरात, मा. विज्ञान माने, महिला उपाध्यक्षपदी मा. शर्वरी पवार, सचिव पदी मा. जगन्नाथ ठोकळे, मा. शंकर माने, मा, श्वेतपद्म कांबळे, मा. रविंद्र कांबळे, मा. विद्या कांबळे, मा. रंजीत ऐवळे यांची नियुक्ती करणेत आली. तर सदस्य पदी मा. तानाजी सातपूते, मा. अशोक कांबळे, मा. प्रताप मधाळे, मा. उत्तम कांबळे, मा. बाळासाहेब भंडारे, मा. अशोकराव पवार, मा. अरूण आठवले, मा. नवनित लोंढे, मा. संजय कांबळे, मा.डॉ. रविकुमार गवई, मा. छाया सर्वदे, मा. माया अदाटे, मा. स्नेहल सावंत, मा. चंद्रभामा केंगारे, यांची निवड करणेत आली व उर्वरीत पदाधिकारी निवड ही दि. ०५/०९/२०२३ च्या बैठकीमध्ये करणेत येईल अशी माहिती अनुसूचित  जाती व जमाती महामेळाव्याचे अध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे साहेबांनी केली.

    याप्रसंगी मा. विवेकरावजी कांबळे यांनी सर्वानूमते महापरिवर्तन मेळाव्याच्या अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल सर्वांचे आभार मानले व पूढे म्हणाले, अनुसूचित  जाती व जमाती समाजातील ६९ जातींना सोबत घेऊन सांगली येथे प्रचंड मोठ्या संख्येने हा मेळावा यशस्वी करू. समाजातील जनतेला उद्भवणाऱ्या समस्या कशापद्धतीने दुर करावयाच्या आहेत या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित समाजाचे नेते आमंत्रीत केले जाणार असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपणास लाभणार आहे. अनुसूचित  समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा मेळावा खुप महत्वाचा आहे. तरी निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रामध्ये महापरिवर्तन मेळाव्यासंदर्भात जनजागृती करायची आहे व जास्तीत जास्त समाजबांधव या मेळाव्यास उपस्थित राहवेत असे प्रयत्न करायचे आहे.

    यावेळी मा. राजेंद्र खरात, मा. मिलिंद मेटकरी, मा. पोपट कांबळे, मा. योगेंद्र कांबळे, मा. भारत ऐवळे, मा. प्रभाकर केंगार, मा. राहुल साठे, मा. आबासो सुवासे, मा. निशांत आवळेकर, मा. सुमित कांबळे, मा. संदिप कांबळे, मा. डब्यू.बी. लकडे, मा. राजू चव्हाण, मा. अभिजीत आठवले, मा. प्रभाकर नाईक, मा. नितेश वाघमारे, मा. अविनाश कांबळे, मा. अविनाश जकाते, मा. सुरेश कांबळे, मा. राजेंद्र कांबळे, मा. संतोष वाघमारे, मा. अशोक ठोकळे, मा. धनंजय वाघमारे, मा. विशाल काटे, मा. सुरेश कांबळे, मा. सौरभ साठे, मा. विरूबापू कांबळे, मा. ॲड. तुषार लोंढे, मा. चंद्रकांत कांबळे, मा. मिलिंद सर्वदे, मा. सचिन सकटे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

____________________________________संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top