कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Admin
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
विवेक वार्ता सांगली - साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगली च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊंच्या साहित्याची माहिती उपस्थितांना  देण्यात आली. तसेच अण्णाभाऊंच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. याशिवाय अण्णाभाऊंनी त्यांच्या रशियातील प्रवासवर्णनातून भारतातील सामाजिक स्थितीचे वर्णन केले आहे. त्यांच्या साहित्यातून वंचित उपेक्षित समाजाचे जीवन रेखाटले आहे. वास्तव दर्शविले आहे. तसेच त्यांच्या रूपाने भारताचे नाव जगात पोहोचवण्याचे काम झाले आहे. अशा या थोर समाजसुधारकास, साहित्यिकास, लोकशाहीरास व माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू मानून साहित्याची निर्मिती करणाऱ्या विचारवंतास कोटी कोटी प्रणाम. 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top