लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी

Admin
  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी. 
  विवेक वार्ता सातारा - लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पवळेश्वरनगर, जिल्हा सातारा येथे साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जयसिंग जाधव सर व उपशिक्षक, कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मोरे सर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य याबाबत मुख्याध्यापक जयसिंग जाधव सर यांनी माहिती दिली, तर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्याची माहिती प्रशांत मोरे सर यांनी दिली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top