भौतिकशास्त्रातील ज्ञानगंगा भिलवडीत; पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांचे ११ जुलै रोजी व्याख्यान

Admin

 भौतिकशास्त्रातील ज्ञानगंगा भिलवडीत; पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांचे ११ जुलै रोजी व्याख्यान 



भिलवडी, दि. ९ : भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ व लेखक प्रा. एच. सी. वर्मा यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक असलेले प्रा. वर्मा हे त्यांच्या कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स या


जगप्रसिद्ध ग्रंथामुळे विशेष परिचित आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये भौतिकशास्त्र विषयाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या साहाय्याने गुंतागुंतीच्या भौतिक संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरते.

सकाळी ८ ते १० या वेळेत इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे तसेच संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे. मुख्याध्यापक एस. एस. मोरे व एसएसबी–आयएपीटी अन्वेशिका, भिलवडीचे प्रमुख प्रा. डॉ. जी. बी. पाटील यांच्या प्रयत्नांतून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व विज्ञानप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top