सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा .
भिलवडी प्रतिनिधी:
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज, मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र वाळवेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक विजय तेली होते.
कार्यक्रमाची सुरुवात थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. वाळवेकर यांनी विज्ञानाच्या योगदानाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवजातीला अपार फायदे झाले आहेत. विज्ञानाने जीवन सोपे, सुखी आणि दीर्घकालीन केले आहे. अनेक जीवघेण्या रोगांचे उच्चाटन झाले आहे. लसीकरणामुळे पोलिओ, गोवर यांसारखे रोग जवळपास नाहीसे झाले आहेत. रोबोटिक शस्त्रक्रिया आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंगमुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद बरे होण्यास मदत होते. आज एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वैद्यकीय इमेजेसचे विश्लेषण करून कॅन्सरसारख्या रोगांची लवकर ओळख करतो, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात. मोबाईल, इंटरनेट, वाहतूक, शिक्षण, मनोरंजन – सर्व काही विज्ञानामुळे शक्य झाले आहे. ज्ञानाची भांडारे (इंटरनेट, डिजिटल लायब्ररी) प्रत्येकाच्या हातात उपलब्ध आहेत.
डॉ. वाळवेकर यांनी आवाहन केले की, विज्ञान हे वरदान आहे, पण ते शाप बनू नये यासाठी त्याचा मानव कल्याणासाठी आणि संतुलित वापर करावा. शेतीत सेंद्रिय पद्धतीकडे वळावे. एआय आणि रोबोटिक्सचा वापर नैतिक व नियमित पद्धतीने करावा. दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान वापरताना मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. विज्ञानातून आवश्यक ते सर्व घ्या, पण अतिरेक टाळा. असे केल्यास विज्ञान खरोखरच मानवजातीचा मित्र राहील.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मा. तावदर, मा. महावीर वठारे, सचिव मानसिंग हाके, सहसचिव के.डी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, जी.एस. साळुंखे, सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. जी.बी. पाटील यांनी केले. पाहुणे परिचय राजीव आरते यांनी करून दिला. सूत्रसंचलन कु. अश्विनी गुणाले यांनी केले तर आभार रोहित महिंद्रकर यांनी मानले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत जागृती निर्माण करण्यासह त्याच्या जबाबदार वापराबाबत संदेश देणारा ठरला.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.



