प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेच्या इयत्ता १०वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100 टक्के, निकालाची परंपरा अबाधित...

Admin

 प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेच्या इयत्ता १० वी  शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के, निकालाची परंपरा अबाधित..



सांगली प्रतिनिधी - 

स्वा. सावरकर प्रतिष्ठान संचलित,प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल यावर्षीही शंभर टक्के लागला .प्रशालेने १००टक्के   निकालाची परंपरा अखंड ठेवली आहे.


  शाळेच्या पहिल्या दिवशी  यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.संस्थेचे अध्यक्ष मा.विजय नामजोशी, कार्यवाह मा.सुनिल देशपांडे, गीता अभ्यासक मा.अनिल रूईकर काका,प्रशालेचे मुख्याध्यापक मा.सुबोध कुलकर्णी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



प्रशालेत  सर्व सहा विषयात मिळून प्रथम क्र. चि.अमेय उमेशचंद्र कदम ९६.५०टक्के,द्वितीय क्र.कु. दिशा देशभूषण शिरगावे ९६.टक्के,तृतीय क्र. कु.सेजल प्रमोद थोरात ९५.८३टक्के,चतुर्थ क्र.(विभागून) चि.शंतनु जयप्रकाश जाधव ९४.६७ % व चि.सुमेध ऋषभनाथ मसुटगे ९४.६७%, पाचवा क्र. कु.संस्कृती रंगनाथ देशपांडे ९४.५०% गुण मिळवून शाळेत पारितोषिके प्राप्त विद्यार्थी ठरले आहेत.

  बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार प्रशालेमध्ये ९० % पेक्षा जास्त गुण २७ विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या निकालामध्ये मानाचा तुरा खोवला आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मुग्धा गोखले यांनी  केले,बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी  वाचन श्री.यशवंत जाधव सर यांनी केले तर शेवटी आभार श्री.पवार सर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रशालेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे परिसरात कौतुक होत आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top