जगात स्वतः ची ओळख निर्माण करा - शिक्षणाधिकारी मा. मोहन गायकवाड
भिलवडी प्रतिनिधी- भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. मोहन गायकवाड साहेब उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने बोलण्याचे धाडस केले पाहिजे, गुणात्मक निकालावर भर दिला पाहिजे, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी ठेवा व जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा असे विचार त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय मोरे हे होते. प्रतिकूल परिस्थितीतही अपार कष्ट करून शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचणाऱ्या गायकवाड साहेबांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्राचार्य संजय मोरे यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम मिळवलेल्या व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. श्रुती पाटील हिचाही सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक महेश पुजारी, भाग्यश्री सुर्यवंशी, आर. आर. हिरुगडे, जी बी पाटील, अशोक पाटील यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांकडून शाळेस रोख रक्कम, भेट वस्तू सुपूर्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक जी. एस साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी राजमाने यांनी तर आभार सौ. एस. पी भोसले यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.