कास्ट्राईब शिक्षक संघटना सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटना  सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न


सातारा प्रतिनिधी - कास्ट्राईब शिक्षक  संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची बैठक व स्नेह मेळावा  दहिवडी माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे संपन्न झाला. या मेळाव्याला राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, सातारा जिल्हाध्यक्ष संजय खरात, सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, सोलापूर जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, उपाध्यक्ष उत्तम मंगल उपस्थित होते.  सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 


कास्ट्राईब शिक्षक संघटना ही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच काम करते असं नाही तर एक सामाजिक व शैक्षणिक चळवळ म्हणून काम करते. समाजातील, तळागाळातील बांधवांप्रती आपले कर्तव्य म्हणून त्यांच्या प्रश्नासाठी कास्ट्राईबच्या माध्यमातून आपण यात सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी करण्यात आले. तसेच येणाऱ्या काळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षक बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी व संघटना सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन कार्याध्यक्ष प्रशांत मोरे यांनी केले. तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीही कास्ट्राईब शिक्षक संघटना प्रयत्नशील असते असे उपाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी विचार व्यक्त केले. भारतीय समाज व्यवस्थेत सर्व समाजाच्या प्रश्नांसाठी कार्य करणारी कास्ट्राईब शिक्षक संघटना असल्याचे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी विचार व्यक्त केले. एक चळवळ म्हणून कास्ट्राईब मध्ये सहभागी व्हा असे आव्हान प्रमोद काकडे यांनी केले.



यावेळी प्रा. लक्ष्मण महानवर, माण तालुका अध्यक्ष, हरिबा दडस, खटाव तालुका अध्यक्ष, अनंत काकडे, फलटण तालुका अध्यक्ष, दादासाहेब जगताप, कोरेगाव तालुका अध्यक्ष, दिपक माने, सातारा अध्यक्ष, रवी ओव्हाळ, वाई तालुका अध्यक्ष,डॉ. विजय सावंत, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष, गुलाबराव शेळके, खंडाळा तालुका अध्यक्ष, रणजित सोनुले, जावळी तालुका अध्यक्ष श्रीमंत मोरे, कराड तालुका अध्यक्ष, सिद्धार्थ बनसोडे, पाटण तालुका अध्यक्ष या निवडी जाहीर करण्यात आल्या. व त्यांचा निवड पत्र देवून सत्कार करण्यात आला.याशिवाय सौ. दयाराणी खरात यांची महिला आघाडी संघटक म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष उमेश गायकवाड, सरचिटणीस दिपक माने, जेष्ठ उपाध्यक्ष बाळकृष्ण भंडारे, प्रमुख सल्लागार अशोक मनूकर, मार्गदर्शक राजकुमार रणवरे, उपाध्यक्ष अरविंद निकाळजे, विठ्ठल निकाळजे, सुशांत मोतलिंग, कायदे सल्लागार डी. डी. क्षिरसागर महिला आघाडी प्रमुख सौ. केशर माने, आदी शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय खरात यांनी केले. तर आभार उमेश गायकवाड यांनी मानले.



संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top