अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Admin

 अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण.. 


अयोध्या - रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

या सोहळ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी राजकारणातील दिग्गज नेते, कलाकार मंडळी तसेच हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. 


 देशातील वैदिक विद्वान या महोत्सवाची पूजा करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान केली जाईल. दुपारी १२ वाजल्यापासून पासून आज दिवसभर हा सोहळा पार पडेल. त्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीला प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा समारोप होईल.

त्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाईल. बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होईल. देशातील तमाम रामभक्तांना प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल. भाविकांना ये-जा करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अयोध्येत रस्त्यांचं रुंदीकरण देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी अयोध्येतील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवता यावी म्हणून १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top