प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची सेकंडरी स्कूल भिलवडी ला भेट

Admin

 

प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची भिलवडीच्या सेकंडरी स्कूलला भेट


भिलवडी प्रतिनिधी - प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. यावेळी वृक्ष संवर्धन, बीज बँक याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड व रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पाच बिया जमवून  त्या शाळेत एकत्रित करून त्यापासून वृक्ष लागवड व रोपवाटिका शाळेच्या परिसरात तयार  करण्याचे आव्हान त्यानी  विद्यार्थ्यांना  केले.


यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल असे सांगितले. तसेच वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली . या कार्यक्रमाला भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे, डॉ. सुनील वाळवेकर,सचिव मानसिंग हाके, सहसचिव के. डी. पाटील मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top