मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यायानिमित रा.ने पाटील गर्ल्समध्ये 'माझी भाषा-माझा अभिमान' व्याख्यान संपन्न

Admin

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यायानिमित रा.ने पाटील गर्ल्समध्ये 'माझी भाषा-माझा अभिमान' व्याख्यान संपन्न


सांगली प्रतिनिधी दि. २३- येथील  श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित प्रा.विठ्ठल मोहिते यांचे 'माझी भाषा-माझा अभिमान' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,'मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा असते. ती मनाला भावते.काळजाला भिडते. आपलं समृद्ध साहित्य, लोककला, परंपरा,संस्कृती, इतिहास,ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान, विचारधन यामध्येच आहे. याचे वारसदार होऊया. भाषासंवर्धनाची जबाबदारी सर्व मराठी भाषकांची आहे.आपण आपली भाषा अधिकाधिक बोला, साहित्यकृती वाचा, अभिव्यक्त व्हा,अनुवादित साहित्य वाचावे व चांगल्या साहित्याचे मराठीत भाषांतर करण्याने मराठी भाषा संवर्धनाबरोबरच समृद्धही बनेल'.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यावेळी त्यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून; मराठीचा अभिमान व्यक्त करणाऱ्या काही निवडक कविता सुंदर सादर केल्या.त्याला विद्यार्थीवर्गाने भरभरून दाद दिली.


    यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. वैष्णवी सुतार हिने स्वागतगीत सादर केले.  स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ. ए. बी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.एस. एम. पाटील यांनी करून दिला.  यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ मधील ज्युनिअर विभागाकडील वार्षिक क्रीडा पारितोषकांचे तसेच वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थिनींनी प्राप्त केलेल्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ.  ए.ए.सुतार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एन.एस. चौगुले यांनी केले. यावेळी शिक्षक व बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top