डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने साजरा.

Admin
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन म्हणून कास्ट्राईब शिक्षक  संघटनेच्यावतीने साजरा

विवेक वार्ता सातारा (प्रतिनिधी) - 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस डाॅ.आंबेडकर यांचा  शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन  म्हणून प्रत्येक शाळा , महाविद्यालय मध्ये साजरा करावा असा शासन निर्णय केला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे  फार मोठी सामाजिक क्रांती केली . भारताच्या राज्य  घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी   संविधानाच्या माध्यमातून  आपल्याला धर्मनिरपेक्षता  स्वातंत्र्य ,समता बंधुता आणि न्याय दिला .

या दिनाचे औचित्य साधून महामानवाचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून  त्याच शाळेत अर्थात प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने साजरा  करण्यात आला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या जनरल रजिस्टर वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दाखल्याची नोंद प्रसिद्ध करण्यात.
या कार्यक्रमास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत मोरे , कास्ट्राईब माध्य.शिक्षक संघटना अध्यक्ष भोसले सर , सचिव तात्याराम मोरे , मुख्य संघटक बाळकृष्ण भंडारे ,संघटनेचे सदस्य सुषमा मोरे विजय खंडकर तानाजी म्हस्के संगिता म्हस्के सौ निलिमा जगताप सौ निता कांबळे सौ शोभा उघडे वर्षा ओव्हाळ  इत्यादी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून प्रतापसिंह हायस्कूलला कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने संगणक संच  देण्याची जाहीर केले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top