अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका कुकडेचे यश.

Admin

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका कुकडेचे यश.

   विवेक वार्ता भिलवडी- अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पंचायत समिती पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत प्रद्युम्न गोसावी, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल, आंधळी याने प्रथम क्रमांक पटकावला तर श्रुतिका शिवाजी कुकडे, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळेतील स्पर्धक  विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. अस्मिता राडे, डॉ. पाटील   व डॉ. शेंडगे सर आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पलूस हे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध शाळांमधील स्पर्धक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या सर्व स्पर्धांचे नियोजन विषय तज्ञ धनंजय भोळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धा पंचायत समिती सभागृहात पार पडल्या

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top