मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूरचे वतीने सत्कार.

Admin
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूरचे वतीने सत्कार.
विवेक वार्ता कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील साहेब यांचा सत्कार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, जिल्हा नेते तानाजी घस्ते, यशवंतराव सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षक संघटनेस सहकार्य करण्याचे आश्वासन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डूकर, कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, कार्याध्यक्ष तुकाराम संघवी, सहसचिव सुरेश कदम, मनपा अध्यक्ष सहदेव कांबळे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष भिमराव तराळ, हातकणंगले तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे, भुदरगड तालुका अध्यक्ष संजय कांबळे, आजरा तालुका अध्यक्ष विजय कांबळे, आदी पदाधिकारी, शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते. 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top