कोल्हापूर जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सत्कार

Admin
कोल्हापूर जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सत्कार
विवेक वार्ता कोल्हापूर - 
      राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीच्या जिल्हा  परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून  संतोष पाटील साहेब यांनी कार्यभार स्वीकारला. यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मा. भोसले, राजाराम वरुटे, रघुनाथ खोत,समन्वय समितीचे अध्यक्ष कृष्णात कारंडे, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संतोष पाटील साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक प्रगती मध्ये राज्यात अग्रेसर असल्याचे सांगितले. त्यामध्ये पूर्व माध्यमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती, इयत्ता आठवी एन एम एम एस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त असल्याचे सांगितले. तसेच पीजीआयच्या परीक्षांमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकाने पुढे असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रामध्ये भरीव काम करणार असल्याचे तसेच नवीन शैक्षणिक प्रयोग व  उपक्रमांची आखणी करणार असल्याची माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे प्रश्न व समस्या सोडवण्याचे आश्वासन  समन्वय समितीला दिले.तसेच समन्वय समितीचे नेहमी सहकार्य राहील याची ग्वाही समितीच्या वतीने देण्यात आली. 
  यावेळी शिक्षक शिक्षक संघ (थोरात गट) जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक संघ (शिवाजी पाटील)राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी बापट, अखिल भारतीय शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष  जयवंत पाटील, सरचिटणीस प्रकाश मगदूम, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, ओबीसी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेताजी कमळकर, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय दाभाडे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top