"छोडो भारत" आंदोलन... 9 ऑगस्ट 1942, ऑगस्ट क्रांती दिन ब्रिटिश सत्तेवर शेवटचा प्रहार करणारे आंदोलन..

Admin
"छोडो भारत" आंदोलन... 9 ऑगस्ट 1942, ऑगस्ट क्रांती दिन ब्रिटिश सत्तेवर शेवटचा प्रहार करणारे आंदोलन..

ब्रिटिशांच्या, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिलं त्यानां आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. स्वातंत्र्याची मशाल पेटवत ठेवू देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तानाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना, क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्याचा हा आजचा दिवस. आजच्या या दिवशी गांधीजींनी भारतीयांना करूया मरू हा मंत्र दिला आणि प्रत्येक भारतीयांमध्ये चेतना संचारली ब्रिटिश सत्तेवर शेवटच्या आघाताची सुरुवात आजच्या या दिवशी सुरू झाले.

गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर छोडो भारत आंदोलनाची घोषणा केली आणि ९ ऑगस्टला क्रांती दिन पाळायचं ठरवलं हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. आज पासून 80 वर्षा पूर्वी झालेल्या ऑगस्ट क्रांती दिनाने भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला सुरंग लावला आणि ते पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल.

1939 साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जग दोन गटात विभागले गेले. आग्नेय आशियात ब्रिटिशांचा जपानच्या सैन्याने पराभव केला. आणि सिंगापूर, बर्मा जिंकून भारताच्या सिमे पर्यंत मुसंडी मारली. जपान कधीही भारतावर हल्ला करणार अशी परिस्थिती निर्माण झाली. याचवेळी भारतात ब्रिटिशांच्या विरोधात प्रखर स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. अशा परिस्थितीत भारताचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे भारतीय जनरल गव्हर्नर लॉर्ड लीनलीथगो यांनी भारतीय नेत्यांना न विचारता 3 सप्टेंबर 1939 साली भारत जर्मनी विरोधात या युद्धात सामील होत असल्याची घोषणा केली. पण या युद्धानंतर भारताला काय मिळणार यावर ब्रिटिशांनी चर्चा करावी अशी भूमिका भारतीय नेत्यांची होती. यातूनच चर्चा करण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 साली क्रिप्स मिशन भारतात पाठवण्यात आले. तरी भारताला पूर्ण स्वराज्य नाकारून डॉ मिनियन स्टेट्स देण्याचा प्रस्ताव मांडला. पण भारतीयांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष उफाळून आला. साम्राज्यवादावर आता अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती.
                    यातूनच वर्ध्यामध्ये  14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणींमध्ये भारत छोडो या आंदोलनाचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1942 रोजी अलाहाबाद मध्ये त्यावर चर्चा होऊन 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया  टॅंक मैदानात राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. आणि या बैठकीत ऐतिहासिक भारत छोडो प्रस्ताव पारित करण्यात आला. देशातील स्वातंत्र्य सैनिकांची एकच मागणी होती ती म्हणजे पूर्ण स्वराज्य.
आंदोलनाची कुणकुण  इंग्रज सरकारला होती. आणि म्हणूनच त्यानी  नऊ ऑगस्ट रोजी च्या पहाटे काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्याचे ठरवले. व आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊस मधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकाने पुढारी व्हावे असा संदेश  गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई  मिराबेन या चौघांना खाली उतरण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही  या घटनेची माहिती वाऱ्यासारखी वेगाने पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेस मध्ये आणि पंडीत नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली. नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन शांत होईल असे  वाटले होते. मात्र नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन करणाऱ्या लोकांच्या ताब्यात  गेले. त्यामुळे देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊता आला. सरकारने जमाव बंदी  लागू केली. पण लोक आता आदेशांना भेट घालत नव्हते.
पोलिसांच्या लाठी हल्ल्याला,  गोळीबाराला जुमानत  नव्हते. जाळपोळ, टेलिफोन  तारा कापणे, पोलिसांवर हल्ले सुरू झाले. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण देश पेटून उठला. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वे अपघात, सरकारी कार्यालयाला आग लावणे, सरकारी खजिन्यांची लूट असे प्रकार सुरू झाले. ब्रिटिशाकडून ही दडपशाही सुरू होती. पाहिजे त्यांना विना चौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता. सरकारने या सर्व प्रकाराला महात्मा गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींनी त्याचा इन्कार केला. आणि सरकारच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. पण यावेळी जगभरातील परिस्थिती ही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते.             
अमेरिका महासत्ता म्हणून उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीने ब्रिटिशांनी मुसंडी मारली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. महायुद्धाच्या आघाडीवर दिल्यासा मिळाल्याने ब्रिटिशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी वापरली. आणि क्रांतीची तिव्रता हळूहळू कमी झाली. भारतावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली. प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर काही नेते भूमिगत राहून जनतेचे नेतृत्व करत होते. यामध्ये जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, सुचिता कृपलाने, राम मनोहर लोहिया यासारख्या नेत्यांनी क्रांतिकारकांना बळ पुरवले. लोकांनी ब्रिटिश शासनाच्या प्रतिकांविरुद्ध निदर्शने करायला सुरुवात केली. या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात महिला  मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या. अरुणा असफली यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गवालिया टॅंक मैदानात तिरंगा फडकवला. तेव्हापासून या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान या नावाने ओळखले जाते.             
 याच वेळी साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची स्थापना झाली. बालीय, बस्ती? मिदनापूर इतर काही भागात अशा प्रकारची प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. या आंदोलनाने भारताच्या भावी राजकारणाचा पाया रचला. ब्रिटिशांनी भारत छोडो आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी सत्तेत राहण्याची नैतिकता गमावली होती. ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया असलेल्या पोलीस आणि लष्करी व्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण संपले होते. त्यामुळे आता भारतावर जास्त काळ सत्ता गाजवू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला शेवटचे हादरे बसायला सुरुवात झाली. ही लढाई अंतिम असेल आणि यानंतर  स्वातंत्र्य मिळेल असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला.
तसेच ब्रिटिशांनी आता आपल्याला सत्ता सोडावी लागणार याची खात्री झाली. अशा या भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि अज्ञात वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे आंदोलन इतिहासात अज्ञात योद्धांच्या बलिदानाने भरून गेले आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार अशा  अनेक साहसी वीरांमुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. छोडे भारत आंदोलन हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हते  तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण करणारे आंदोलन होते. अशा या आंदोलनात  प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात, अज्ञात सर्व क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन या सर्व वीरांना सलाम.... 
                           
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top