कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणीची ९ जुलै रोजी पुणे येथे महत्वपूर्ण बैठक

Admin

 

कास्ट्राईब  शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य (र. नं ५७०१) राज्य कार्यकारिणीची ९ जुलै रोजी अल्पबचत भवन येथे महत्वपूर्ण बैठक

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा राज्य अध्यक्ष रविंद्र पालवे यांच्या हस्ते सत्कार होणार.

विवेक वार्ता - सांगली l दि.८/७/२०२३

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत लढणारी, त्यांना न्याय मिळवून देणारी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक राज्य अध्यक्ष रविंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी दिली.


या बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा परिचय व सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय राज्य कार्यकारिणीतील रिक्त पदांवर नियुक्ती, जानेवारी 2024 मध्ये आयोजित करावयाच्या अधिवेशनाबाबत चर्चा, नवीन सभासद नोंदणी करण्याबाबतचे नियोजन व चर्चा, या सारख्या विषयांवर चर्चा व मंथन केले जाणार आहे. री सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधु-भगिनींना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

_

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top