कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न
विवेक वार्ता - पुणे दि. ९ जुलै २०२३
स्थानिक अल्पबचत भवन पुणे या ठिकाणी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य रं.न.५७०१/२० ची राज्य कार्यकारणीची बैठक मा.रविंद्र पालवे राज्याध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीला राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे, अहवाल वाचन केले.
या बैठकीमध्ये एकूण पाच विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले यामध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या रिक्त असलेल्या कार्याध्यक्ष पदी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी मा.प्रशांत मोरे, सातारा यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. मुख्य संघटन सचिवपदी लातुरचे राहुल गायकवाड यांची निवड, संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी किरण मानकर यवतमाळ,श्रीशैल कोरे सोलापूर,डॉ पारस जाधव, सिंधुदुर्ग यांची निवड करण्यात आली. अतिरिक्त सरचिटणीस म्हणून तुषार आत्राम यवतमाळ, महिला प्रतिनिधी म्हणून सौ.वंदना भामरे, धुळे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या .
_
या सभेमध्ये संघटनेचे दुसरे राज्य अधिवेशन पुण्यात जानेवारी 2024 मध्ये घेण्याचे सर्वांनुमते निश्चित करण्यात आले. सभेस शेकाप चे आमदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी माजी आमदार बळीराम पाटील यांनी स्नेह भेट दिली.
यावेळी राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.