कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन व महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

Admin

 कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन व महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

सातारा प्रतिनिधी - कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन व जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा सातारा जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सौ. रूपाली पोळ उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याध्यक्ष आकाश तांबे हे होते. सुरुवातीला रूपाली पोळ, राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या हस्ते  सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व अधिवेशनाचे उद्घाटन  करण्यात आले. 


  आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणाऱ्या सत्यवानाच्या सावित्री पेक्षा समाजा तील सर्व स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार करणाऱ्या, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा आदर्श आजच्या स्त्रीने जोपासावा असे विचार नायब तहसीलदार सौ. रुपाली पोळ यांनी व्यक्त केले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचवण्याचे काम या पहिल्या महिला अधिवेशनाच्या निमित्ताने करत असल्याचे मत राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी व्यक्त केले. कॉम्रेड कमलाताई कोंडके यांनी चळवळीतील स्त्रियांचे योगदान याबाबत स्त्रियांना मार्गदर्शन केले. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्या विनोदीनी मिरजकर यांनी आजच्या स्त्रीची जबाबदारी याविषयी महिलांना मार्गदर्शन केले.    याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांचा फेटा, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन  गौरव करण्यात आला. तसेच रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. सौ.संघमित्रा फुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वेळी वरिष्ठ राजीव उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत मोरे,राज्य कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, दयानंद सरवदे, उत्तम मंगल, सुरेश कोळी, बाळकृष्ण भंडारे, सोमलिंग कोळी, महिला आघाडी प्रमुख संगीता कांबळे, छाया वर्धन, सरपंच साधना नेवसे, माजी सभापती शुभांगी नेवसे, हेमलता कुर्डूकर, संजीवनी कांबळे, प्रज्ञा वाघोदे, माधुरी तांबे, शितल भंडारे, कांचन बल्लाळ, कांचन सावंत, रमा काकडे, शुभांगी शिंगे,विभा रोकडे, संगिता मनुकर, मंजुषा इरकशेट्टी, श्रीशैला सोनकांबळे, मंगल सावंत, विद्या कांबळे, अर्चना सरवदे, प्रतिक्षा कांबळे, सुनिता माने, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वागत व प्रास्ताविक प्रशांत मोरे यांनी केले. सुत्रसंचलन सुषमा मोरे, कांचन बल्लाळ यांनी केले तर आभार शितल भंडारे यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top