कास्ट्राईब नेते मा. नामदेवराव कांबळे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्ताने सत्कार संपन्न.

Admin

 कास्ट्राईब नेते मा. नामदेवराव कांबळे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्ताने  सत्कार संपन्न.


कोल्हापूर - कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांच्या ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे होते. यांच्या हस्ते शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या व समानतेच्या तत्त्वासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले असे विचार माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. 


यावेळी व्यंकाप्पा भोसले यांनी नामदेवराव यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे सुशील कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे.  राजेंद्र वाघमारे, दिलीप पवार, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत,विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, गौतम वर्धन सर्व पदाधिकारी व शिक्षक बंधु-भगिनी, नातेवाईक आप्तेष्ट, मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top