नेमिनाथ कोथळे व संदीप पाटील यांना मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर

Admin

 नेमिनाथ कोथळे व संदीप पाटील यांना मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर  

      मा. संदीप पाटील      मा. नेमिनाथ कोथळे 

सांगली प्रतिनिधी - सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने प्रतिवर्षी 'मराठी भाषा गौरव दिना'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांना देण्यात येणारे 'गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार' नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये श्री.नेमिनाथ आप्पासो कोथळे (टाकळी बोलवाड हायस्कूल, टाकळी. तालुका -मिरज) व श्री. संदीप भगवान पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, मुचंडी.तालुका- जत) या नावांची घोषणा डॉ.श्रीपाद जोशी, प्रा.सुभाष कवडे व शाहीर पाटील यांच्या निवड समितीने केली. या पुरस्काराचे वितरण भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव  कदम महाविद्यालय, सांगली (सांगलीवाडी) येथे शनिवार दिनांक -२ मार्च,२०२४ रोजी दुपारी-२:३०वाजता विशेष समारंभात होणार आहे, अशी माहिती अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल मोहिते व बजरंग संकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

       या 'मराठी भाषा गौरव दिन' समारंभप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून ;यामध्ये जिल्ह्यातील मराठी अध्यापकांचे कविसंमेलन,प्रा.सुभाष कवडे यांच्या 'प्रकाश पेरणी' या काव्यसंग्रहावरती  प्रा.डाॅ. विष्णू वासमकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार असून; यामध्ये शाहीर पाटील, विठ्ठल मोहिते व महादेव चौगुले हे या चर्चेत सहभागी होणार आहेत. 'तेजस्वी प्रकाश' या विशेषांकाचे प्रकाशन व गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार- २०२३ चे वितरण मा. प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांचे शुभहस्ते व पाहुणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन अध्यापक संघाचे श्री. दिलीप पवार ,सौ.वैशाली आडमुठे श्री.प्रकाश वायदंडे, श्री.रमेश पाटील व सौ. सुरेखा कांबळे  हे करीत आहेत.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top